Aashadhi Wallpaper - Vithu Mauli Tu, Mauli Jagachi

Vithu Mauli tu Mauli Jagachi
विठुमाऊली तू माऊली जगाची


विठुमाऊली तू माऊली जगाची ।
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।

काय तुझी माया सांगु श्रीरंगा ।
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा ।
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा ।
अमृताची गोडी आज आलीया अभंगा ।
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची ।
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।

लेकरांची सेवा केलीस तू आई ।
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई ।
तुझ्या उपकारा जगी तोड नाही ।
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई ।
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची ।
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।
 
Vithu Mauli Song performed at Shree Sai Satcharitra Panchashil Exam Prize Distribution Program

0 comments:

 

Aniruddha Bapu Visit to Vitthal Mandir © 2014 Edited by SAUF | Originally Designed by Cheap Hair Accessories

Thanks to: Sovast Extensions Wholesale, Sovast Accessories Wholesale and Sovast Hair